July 16, 2024 3:36 PM July 16, 2024 3:36 PM
8
नीट पेपर फुटी प्रकरणी झारखंडमध्ये एकाला अटक
नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल रात्री झारखंडमधे हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली आहे. त्याच बरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.