July 20, 2025 2:51 PM July 20, 2025 2:51 PM
2
पनवेल रेल्वे स्थानकावर परदेशी महिलेकडून अंमली पदार्थ जप्त
पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिला प्रवाशाकडून दोन किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. मंगला एक्स्प्रेस मधून ३५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या या नायजेरियन महिलेला बंगळुरु अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि पनवेल रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त अभियानात अटक करण्यात आली. पुढील चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.