April 12, 2025 7:49 PM April 12, 2025 7:49 PM
11
५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्र्यांकडून सुपूर्द
मालमत्ता विमोचन समितीचे अध्यक्ष डी के सेठ यांच्याकडे ५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज सुपूर्द केला. रोझ व्हॅली पॉन्झी घोटाळ्यातील मूळ गुंतवणूकदारांना मालमत्ता परत करण्यासाठी मालमत्ता विमोचन समिती स्थापन केली आहे. या रकमेतून समितीकडे दाखल झालेल्या ३१ लाख दाव्यांपैकी साडेसात लाख गुंतवणूकदारांच्या रकमा अंशतः परत करणं शक्य होणार आहे. रोझ व्हॅली समूहाविरुद्ध पश्चिम बंगाल, ओदिशा, आसाम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींवरून सक्तवसुली संचाल...