December 14, 2024 8:15 PM

views 15

पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित

शेतपिकाला हमीभाव देण्याचा कायदा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी जमावाने शंभू तपासणी नाका ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना हरियाणा पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. त्यात काही शेतकरी जखमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून गेले १८ दिवस उपोषण करणारे शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांना वैद्यकीय सहाय्य देण्याचे ...

November 3, 2024 6:24 PM

views 13

पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक

सरकारनं आज सांगितलं की पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक झाली आहे. यापैकी पंच्याऐंशी लाख टनांहून अधिक खरेदी पंजाबमधल्या राज्य संस्था आणि भारतीय अन्न महामंडळानं केली.  सरकारनं ठरविल्यानुसार ग्रेड ‘अ’ तांदळासाठीमधल्या घनिष्ठ भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी ते सिंगापूरच्या नेतृत्वाचीही भेट घेतील. तेविसशे वीस रुपये या किमान आधारभूत किमतीवर धानाची खरेदी केली जात आहे असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. चा...

September 25, 2024 9:51 AM

views 10

पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्यातील वाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सर्वोच्च न्यायालयानं पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्याच्या विस्ताराबाबत ताशेरे ओढले आहेत. ही फसवणूक असून, यामुळं अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना मागील दाराने प्रवेश मिळण्याची संधी दिली जात आहे आणि देशातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांचा कोटा वाढविण्यासाठी पंजाब सरकारनं काढलेल्या अधिसूचना रद्द करणाऱ्या पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण...