June 27, 2025 4:18 PM June 27, 2025 4:18 PM

views 10

मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या 1 ते 10 जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहेत. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी 83 आषाढी विशेष गाड्याही चालवल्या जात आहेत. 29 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह तिकीटविक्री सुरू होईल. तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.  

June 27, 2025 9:55 AM June 27, 2025 9:55 AM

views 14

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना निरा नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं. पालखी आज लोणंदचा मुक्लाम आटोपून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत श्री गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव शहरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांनी रस्त्यावर फुलांच्या पायघड्...

June 21, 2025 3:40 PM June 21, 2025 3:40 PM

views 18

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम

पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत. दोन्ही पालख्यांचं काल पुण्यात स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली.    आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल. उद्या सकाळी दोन्ही पाल...