July 6, 2025 8:22 PM July 6, 2025 8:22 PM

views 13

आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे. सर्वत्र जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या. विठूमाऊली आपल्या समाजाला आनंदाची आणि समृद्धीची वाट दाखवेल, अशी भावना त्यांनी समजामाध्यमावर व्यक्त केली. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणी...

July 6, 2025 7:26 PM July 6, 2025 7:26 PM

views 10

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठलचरणी साकडं

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर यावेळी उपस्थित होते. सर्व विठ्ठल...

July 5, 2025 7:34 PM July 5, 2025 7:34 PM

views 12

आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल, आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शनाचंही आयोजन

आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरी इथं अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांना विठ्ठलाच्या भेटीची आतुरता लागली असून पंढरपुरात ५ लाखांपेक्षा जास्त वारकरी दाखल झाले आहेत. पंढरपुरात, नगर प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. मंदिरामध्ये ...

July 5, 2025 5:22 PM July 5, 2025 5:22 PM

views 16

आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल

आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथं मुक्कामी असून संत तुकाराम महाराज, सोपान काका महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्या पंढरपूर जवळ पोहोचल्या आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशीपूर्वीच  पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत. पंढरपुरात, नगर प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. त...

June 22, 2025 3:49 PM June 22, 2025 3:49 PM

views 6

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात स्वच्छता अभियानाला सुरुवात

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. आज सकाळी शहरात ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात १४८ टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी वारीच्या आधीची ही स्वच्छता मोहीम असून वारीनंतरही अशी मोहीम राबवली जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचं आणि पवित्र धार्मिक ठिकाण असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे,  पंढरपूर कॉरिडॉर सर्वांच्या संमतीने ...

March 29, 2025 7:49 PM March 29, 2025 7:49 PM

views 15

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

November 10, 2024 3:30 PM November 10, 2024 3:30 PM

views 12

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाई

येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी सांप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. पंढरपुरात या दोन्ही दिवशी मोठी जत्रा भरते. हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात. कार्तिकी एकादशीच...

November 6, 2024 6:17 PM November 6, 2024 6:17 PM

views 9

कार्तिकी यात्रेनिमित्त ३ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या

पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३ विशेष अनारक्षित गाड्या चालवणार आहे. ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून या गाड्या चालवण्यात येणार आहेत. लातूर-पंढरपूर-लातूर ही गाडी १२ आणि १३ नोव्हेंबरला चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.          

November 5, 2024 2:57 PM November 5, 2024 2:57 PM

views 12

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आजपासून दर्शनासाठी २४ तास खुलं

श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुलं असणार आहे.

July 17, 2024 6:34 PM July 17, 2024 6:34 PM

views 16

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पंढरपूर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शाहू महाराज सांस्कृतिक भवनासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यात आणखी १० कोटींची भर घालण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.