October 13, 2025 7:17 PM October 13, 2025 7:17 PM
3.4K
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. पुणे जिल्हा परिषदेतल्या ७३ गटांपैकी सात जागा अनुसूचित जातीसाठी, पाच जागा अनुसूचित जमातीसाठी, तर १९ जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७४ पैकी ३७ गट महिलांसाठी राखीव आहेत, दहा जागा इतर मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी, ९ जागा सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी, १५ अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी तर तीन जागा अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आरक्षित आहेत....