January 13, 2026 7:10 PM

views 110

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ‘या’ दिवशी होणार

राज्यातल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका आयोगाने आज जाहीर केल्या.   या निवडणुकांसाठी १६ जानेवारी पासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि २१ ...