June 21, 2025 10:17 AM June 21, 2025 10:17 AM
7
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात उत्साहात स्वागत
पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यनगरीत आगमन झालं. स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली. आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल. उद्या सकाळी दोन्ही पालख्...