August 6, 2024 3:49 PM August 6, 2024 3:49 PM

views 13

पालघर जिल्ह्यात आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा

पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे इथल्या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं आहे. उलटी, मळमळ, यासारखा त्रास झाल्यानं या मुलांना आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्ह्यातल्या आणखी काही आश्रमशाळेतल्या मुलांनाही जेवणातून विषबाधा झाल्याचं दिसून आलं आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली. या मुलांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सध्या ३० मुलं उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 11, 2024 8:19 PM July 11, 2024 8:19 PM

views 12

पालघरमध्ये युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या मणिपूर या गावातून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त केला. काल रात्री छापा टाकून युरियाची साठ पोती जप्त केली. जप्त केलेल्या युरियाचा तपासणी अहवाल आल्यानंतर हा नमुना शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या युरिया खताशी जुळला तर दोषींवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.

June 19, 2024 4:24 PM June 19, 2024 4:24 PM

views 7

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.   वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ६८ रिक्त जागांसाठी आज सकाळपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांसाठी चार हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील तीन दिवस चालणार आहे.     बुलडाणा जिल्हा पोलिस दला...