December 22, 2024 6:03 PM December 22, 2024 6:03 PM

views 15

पालघरमध्ये प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष उपक्रम

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यात, गावात कचरा स्वरुपात पडलेल्या, दुकानांमधे पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमधे त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाजारात विकून महिन्याला 40 ते 50 हजारांचं आर्थिक उत्पन्न मिळू शकेल.

December 15, 2024 3:24 PM December 15, 2024 3:24 PM

views 13

पालघर जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाचं आयोजन

पालघर जिल्ह्यात ११ डिसेंबर पासून सुरु झालेला सिकलसेल जनजागृती सप्ताह येत्या १७ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात २००९ पासून जवळपास १३ लाख ९६ हजार ३५३ इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या आहेत. त्यात २४ हजार २२८ वाहक आणि १ हजार ६०६ सिकलसेलने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोफत औषधोपचार, रक्त पुरवठा याबरोबरच त्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे. दरम्यान या रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभ सुद्धा देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आल...

December 8, 2024 7:00 PM December 8, 2024 7:00 PM

views 9

१२वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

१२ वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकंदर ५८ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.         ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान साक्षी मलिक या मॅरेथॉनची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून उपस्थित होती.     थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर फायदा घेत वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. २ तास, १८ मिनिटं आणि १९ सेकंदांची वेळ नोंदवत ...

November 17, 2024 1:22 PM November 17, 2024 1:22 PM

views 10

स्वीप उपक्रमाअंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप उपक्रमा अंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं होत.    या ३ कि.मी आणि ५ कि.मी मॅरेथॉन मध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र तसचं पालघर जिल्ह्यातल्या शाळा-कॉलेज मधील १८ वर्षाखालील मुलं आणि मुली, १८ वर्षावरील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, कीडा संस्था, विविध कार्यालयातील अधिकारी आणि  कर्मचारी, पोलीस, भारत स्काऊड गाईड,...

November 10, 2024 3:26 PM November 10, 2024 3:26 PM

views 14

पालघर जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत चित्ररथाचं आयोजन

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी SVEEP मोहिम पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. "No Voter to be left behind" "Nothing Like Voting, I Vote For Sure" या संकल्पनेवर आधारीत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने SVEEP उपक्रमाअंतर्गत चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात फिरुन जनजागृती करणार आहे.

November 9, 2024 5:04 PM November 9, 2024 5:04 PM

views 12

पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलिसांनी ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पालघर जिल्ह्यात वाडा पोलिसांनी आज एका बनावट एटीएम व्हॅन मधली ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नवी मुंबईतल्या ऐरोली इथून आणलेली ही रक्कम विक्रमगड बँकेत नेली जात असल्याचा बनाव करण्यात येत होता. मात्र त्याबाबत समाधानकारक उत्तरं तसंच पुरावे न मिळाल्यामुळं पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. या रकमेचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

September 11, 2024 6:04 PM September 11, 2024 6:04 PM

views 12

पालघरमध्ये ग्रामीण भागात आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किमान या अभियानाच्या माध्यमातून का होईना पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या माता आणि बालकं आता पोषक आहार घेऊ लागले आहेत.  वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या बालकांना ताजा पोषण आहार मिळत आहे. तसचं गर्भवती मातांना देखील टीएचआरच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरवला जात आहे. गर्भवती मातांनी कशा प्रकारचा आहार घ्यावा, याबाबतची सर्व माहिती गर्भवती मातांना तिथल्या अ...

September 7, 2024 7:20 PM September 7, 2024 7:20 PM

views 9

पालघर जिल्ह्यात स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. पंधराव्या वित्त आयोगातल्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत या दिनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांतर्गत विरारमधल्या म्हाडा मैदानात वृक्षरोपण करण्यात आलं. तसचं ‘एक पेड माँ के नाम’ ही मोहिम राबवण्यासाठी आयुक्तांच्या हस्ते स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आदींना रोपांचं वाटप करण्यात आलं.

August 30, 2024 1:39 PM August 30, 2024 1:39 PM

views 7

वाढवण इथं उभारण्यात येणाऱ्या खोल पाण्यातल्या सर्वात मोठ्या बंदराचं आज प्रधानमंत्री करणार भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.   पालघरमधे उभारण्यात येणारं वाढवण बंदर देशाच्या विकासात भरीव योगदान देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

August 7, 2024 6:29 PM August 7, 2024 6:29 PM

views 6

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असेल.   पालघर जिल्ह्यातल्या उमेदवारासांठी १२ ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.    उमेदवारांना https://...