July 20, 2025 6:49 PM July 20, 2025 6:49 PM

views 35

पालघरमध्ये युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून पालघर जिल्ह्यात यंदा अंदाजे २० रोजगार मेळावे घेण्यात येणार असून पहिला मेळावा येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडच्या रिक्त पदांची नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

May 31, 2025 6:22 PM May 31, 2025 6:22 PM

views 18

पालघरमधे मेंढवन घाटात अपघातात दोघांचा मृत्यू

पालघरमधे मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.

April 10, 2025 3:29 PM April 10, 2025 3:29 PM

views 14

पालघर जिल्ह्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक प्रसूती सेवा पुरविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच पालघर जिल्ह्यानं राज्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळवला आहे.   जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” हा पुरस्कार सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आ...

March 14, 2025 6:18 PM March 14, 2025 6:18 PM

views 18

पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात मनोर इथल्या ट्रॉमा केअर सेंटर तसंच नंडोरे इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर आबिटकर बोलत होते. पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणाच्या समस्येचा बारकाईनं अभ्यास करून या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचंही आबिटकर यांनी सां...

February 10, 2025 3:19 PM February 10, 2025 3:19 PM

views 13

पालघरमध्ये राबवण्यात येणार हत्तीरोग दुरीकरण मोहीम

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, विक्रमगड आणि डहाणू नगरपरिषद क्षेत्रात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डी.इ.सी आणि अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी ८२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला याचा  लाभ होईल. दोन वर्षांपेक्षा लहान  बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्व जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे.  जिल्ह्यात हत्तीरोगाच्या जुन्या रुग्णांची संख्या ही ६२० आहे. हत्तीरोगामुळे अपंगत्व आलेल्या २३५ र...

January 26, 2025 7:23 PM January 26, 2025 7:23 PM

views 9

पालघरमध्ये ९ बांगलादेशी नागरिकांना अटक

पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडीपाडा येथून शुक्रवारी त्यांना पकडण्यात आलं. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ते पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर गावातून भारतात घुसले होते.

January 22, 2025 3:08 PM January 22, 2025 3:08 PM

views 14

पालघरमध्ये पाणथळ भागांमध्ये हळदी कुंकू पक्षांचे थवे

पालघर जिल्ह्यात पाणथळ भागांमध्ये अनेक स्थलांतरित पक्षांचे थवे दिसत असून यात प्रामुख्याने स्पॉटबिल्ड डक या पक्षाचा समावेश आहे. बदकांच्या पंखाच्या बाजूने पांढऱ्या, तपकिरी आणि हिरव्या रंगाचे पट्टे असतात तसंच, यांचे पाय तांबड्या रंगाचे असतात. चोचीवर असलेल्या लाल आणि पिवळ्या रंगामुळे या बदकांना स्थानिक भाषेत हळदी कुंकू असं म्हटलं जातं. जिल्ह्यात या बदकांचे थवे पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक गर्दी करत आहेत. 

January 13, 2025 8:18 PM January 13, 2025 8:18 PM

views 16

पालघर जिल्ह्यातल्या खोमारपाडा गावाचा एक नवा आदर्श

शासनाच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातलं खोमारपाडा या गावानं एक आदर्श घालून दिला आहे. या गावातल्या प्राथमिक शाळेत रुजू झालेले बाबू मोरे यांनी शाळकरी मुलांच्या मदतीनं गावातल्या शेतीचा आणि पर्यायानं गावकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट केला आहे. काही काळापूर्वी साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावातली ९० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबं रोजगारासाठी स्थलांतर करत होती. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही होत असे. हे थांबवण्यासाठी मोरे यांनी मुलांना शेतीचे धडे देऊन श...

January 10, 2025 3:29 PM January 10, 2025 3:29 PM

views 12

नालासोपारा इथं रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी झाले. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. परफ्यूमच्या बाटल्यांवरची वापराची शेवटची तारीख बदलण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाटल्यांचा स्फोट झाला, असं पोलिसांनी सांगितलं. जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. पुढचा तपास सुरु आहे.  

December 30, 2024 2:46 PM December 30, 2024 2:46 PM

views 16

पालघरमध्ये एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, ३ कंपन्या जळून खाक

पालघर जिल्ह्यात बोईसर-तारापूर एमआयडीसीमध्ये यू. के. अरोमेटिक्स अँड केमिकल या कंपनीत काल लागलेल्या आगीत ३ कंपन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.