December 29, 2025 7:13 PM December 29, 2025 7:13 PM

views 4

Palghar : रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली.  या बैठकीत डीएफसीसी अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन, बोरीवली–विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तसचं रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन तसंच अनुदान वितरणासह अन्य अडचणींविषयी  सखोल चर्चा झाली.

December 6, 2025 3:20 PM December 6, 2025 3:20 PM

views 9

पालघर जिल्ह्यात ९ टन प्लास्टिक जप्त

पालघर जिल्ह्यातल्या एका गोदामातून सुमारे ९ टन बंदी घातलेलं प्लास्टिक जप्त केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. वसई विरार महापालिकेनं आजवर केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. गोदाम मालकाला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

November 29, 2025 3:01 PM November 29, 2025 3:01 PM

views 6

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला अटक

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला पोलिसांनी आज अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे १११ कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न त्याने केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचं बनावट पत्र बँकेत सादर करुन हे पैसे घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण बँकेतल्या कर्मचाऱ्यांना शंका आल्यानं त्यांनी पडताळणी केली, तेव्हा हा बनाव उघड झाला. 

November 22, 2025 7:00 PM November 22, 2025 7:00 PM

views 47

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या सभेत केलं. शिंदे यांनी डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा इथं आज जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आह...

November 1, 2025 7:33 PM November 1, 2025 7:33 PM

views 26

पालघरमध्ये पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचं आयोजन

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात पोलीस दलातले अधिकारी,  अंमलदार तसंच सुमारे ८,००० नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना एकतेची शपथही देण्यात आली.    अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथंही रन फॉर युनिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये पोलीस, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी तसंच नागरिक सा...

October 5, 2025 3:40 PM October 5, 2025 3:40 PM

views 38

पालघर जिल्ह्यातल्या ८ गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड

ग्राम विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातल्या आठ गावांची ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव ठरलं आहे.   कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख असं मिळून ५० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते, रोजगार मेळावा आणि सेवा पंधरवडा समारोप समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस...

August 28, 2025 6:46 PM August 28, 2025 6:46 PM

views 9

विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे. विरार मधल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला होता. इमारतीमधल्या ५० पैकी १२ सदनिका यात कोसळल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुुटुंबांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या इमारतीला मे महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस दिली होती, मात्र लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही, असं ...

August 27, 2025 3:41 PM August 27, 2025 3:41 PM

views 22

पालघर जिल्ह्यात इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा मागील भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्य़ा सुटका आणि बचाव कार्य करत आहेत.   आतापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही इमारत अनधिकृत होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली होती अशी माहिती वसईविरार महापालिका आयुक...

August 10, 2025 6:18 PM August 10, 2025 6:18 PM

views 7

जव्हारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं  लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. आदिवासीबहुल जव्हार तालुक्यामधल्या  नागरिकांना आता न्याय मिळविण्यासाठी लांब प्रवास करावा लागणार नाही. अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नव्या न्यायालय भवनामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातल्या  न्यायालयीन प्रक्रियेच्या वेगवान पर्वाची आता सुरुवात झाली आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

July 20, 2025 6:49 PM July 20, 2025 6:49 PM

views 14

जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या सरपंच आणि महिला बचत गटांसाठी कार्यशाळेचं आयोजन

जव्हार इथल्या प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या सरपंच आणि महिला बचत गटांना प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबद्दल माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड तालुक्यातल्या सरपंचांनी आणि महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांनी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान नेमकं काय आहे याची माहिती जाणून घेतली.