September 23, 2025 2:39 PM

views 31

फ्रान्सकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून फ्रान्सची औपचारिक मान्यता असल्याचं आज घोषित केलं. इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकंदरम्यानच्या शांततेला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मॅक्रॉन यांनी आज न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक बैठकीच्या उदघाटनपर सत्रात ही माहिती दिली.    ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगाल यांनी काल स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्याला औपचारिक मान्यता दिली होती.   दरम्यान, पॅलेस्टाईनला स्वतंत...

September 21, 2025 8:06 PM

views 28

यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या शांततेसाठी या मान्यतेला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी देखील संयुक्त निवेदनाद्वारे पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली.

April 24, 2025 8:05 PM

views 23

इस्रायलने उत्तर गाझामधे केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने उत्तर गाझामधे आज केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, आपण हमास आणि इस्लामिक जिहाद केंद्राला लक्ष्य केल्याचं इस्त्रायलनं म्हटलं आहे. गाझा पट्टीत इतर भागात झालेल्या हल्ल्यात सहा जणांचं कुुटुंब तसंच छावणीत राहणारे पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. इस्रायलने १९ मार्चला गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला सुरू केल्यानंतर १ हजार ९७८ जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.  

February 23, 2025 1:50 PM

views 23

…तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार – इस्रायल

पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासकडून ओलिसांच्या यापुढल्या गटाच्या सुटकेची पुष्टी होईपर्यंत आणि यासाठी कोणतीही अपमानास्पद वागणूक न देता ही सुटका केली, तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका इस्रायल करेल, असं इस्रायलनं म्हटलं आहे. काल हमासनं सहा इस्रायली ओलिसांचं सार्वजनिक हस्तांतरण केल्यानंतर इस्रायलनं हा निर्णय घेतला. इस्रायली प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली आहे.

July 16, 2024 3:25 PM

views 30

पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरच्या निधीचा पहिला हप्ता भारताकडून जारी

भारतानं पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरचा निधीचा पहिला हप्ता काल संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेकडे म्हणजे यूएनआरडब्ल्यूएकडे काल जारी केला. भारतानं 2024-25 या वर्षात पन्नास लाख डॉलर मदत देण्याचं जाहीर केलं आहे. पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी औषधं, शिक्षण, मदत आणि सामाजिक सेवा यांच्यासाठी हा निर्धी वापरला जाणार आहे, असं समाजमाध्यमांवरच्या संदेशात भारतानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी भारतानं यूएनआरडब्लूला तीन कोटी पन्नास लाख डॉलरचा निधी दिला होता.