May 21, 2025 1:19 PM

views 35

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोऱ्याकडून ३३० पाकिस्तानी रुपये जप्त

पंजाबमधल्या अमृतसर इथं एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलानं काल अटक केली. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेच्या आत येण्याचा प्रयत्न करत होता, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला थांबवलं आणि ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३० पाकिस्तानी रुपये सापडले. सीमा सुरक्षा दलानं त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.