December 13, 2024 12:12 PM December 13, 2024 12:12 PM
31
पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी तोषखाना प्रकरणात दोषी
पाकिस्तानच्या एका न्यायालयाने पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सौदी राजघराण्याने मे 2021 च्या भेटीमध्ये काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या त्या वस्तू सरकारी तोषखान्यात जमा करण्याऐवजी इम्रान खान यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या असा आरोप पाकिस्तानच्या एन ए बी नं केला आहे. इम्रानखान यांच्यावर सध्या अनेक आरोप असून ते रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत.