March 13, 2025 10:18 AM March 13, 2025 10:18 AM
13
पाकिस्तान : ‘जाफर एक्सप्रेस’ रेल्वेवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या संघर्षाचा अखेर
पाकिस्तानमध्ये, बोलन जिल्ह्यात जाफर एक्सप्रेस या पॅसेंजर रेल्वेगाडीवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर बलोच लिबरेशन आर्मीचे म्हणजे बीएलएचे बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यातील संघर्ष 24 तासांहून अधिक काळानंतर अखेर संपल्याचं वृत्त आहे. हल्लेखोरांना मारण्यासाठी आणि ओलिसांना सोडवण्यासाठीची लष्करी कारवाई मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. किमान 346 ओलिसांना वाचवण्यात आलं असून 50 हल्लेखोरांना मारण्यात आलं. मात्र या संघर्षात 21 ओलिसांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाहून खैबर पख्तूनख्वाची प्रांतीय ...