March 11, 2025 8:17 PM March 11, 2025 8:17 PM
4
बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून रेल्वेवर हल्ला, सैन्याचे ६ कर्मचारी ठार १०० प्रवासी ओलीस
पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी पेशावर-क्वेट्टा जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला आहे. त्यात पाकिस्तानी सैन्याचे ६ कर्मचारी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी 100 हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. या रेल्वेत साडे चारशेहून अधिक होते. या रेल्वेगाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे ती रुळावरून घसरल्याची माहिती बलुचिस्तान प्रांताचे सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दहशतवादी गटाने स्वीकारली असून पाकिस्तानी सैन्याने हस्...