April 26, 2025 1:06 PM April 26, 2025 1:06 PM
6
3 दशकं दहशतवादी गटांना सहाय्य केल्याची पाकिस्तानची कबुली
पाकिस्ताननं गेली तीन दशकं दहशतवादी गटांना सहाय्य केलं, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी दिली आहे. पाश्चिमात्त्य देशांच्या वतीनं हे घृणास्पद काम पाकिस्तान करत होता, असं त्यांनी एका ब्रिटिश वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं. मात्र ही मोठी चूक होती आणि या चुकीची शिक्षा पाकिस्ताननं भोगली आहे, असंही ते म्हणाले. सोविएत - अफगाण युद्ध तसंच तालिबानविरोधातल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या लढाई वेळी पाकिस्ताननं पश्चिमेसोबत युती केली नसती तर देशाची आंतरराष्ट्रीय प्...