June 22, 2025 2:35 PM June 22, 2025 2:35 PM

views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA कडून दोघांना अटक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे. परवैझ अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवाद्यांची महिती मिळाली असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं. ते तिघे पाकिस्तानी नागरिक असून लष्कर ए तैयबाशी संबंधित आहेत. पहलगाममधे हिल पार्क इथं परवैझ आणि बशीर यांनी या तिघांना अन्न, निवारा आणि इतर मदत दिली होती. पुढचा तपास सुरु आहे.

June 17, 2025 3:05 PM June 17, 2025 3:05 PM

views 14

FATF कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं म्हणजेच एफएटीएफनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या आर्थिक मदतीशिवाय असे हल्ले शक्य होत नाहीत असं या कृती गटानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कुठलाही एक देश किंवा संस्था एकट्याने  दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करू शकत नाही, तर दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं एफएटीएफच्या अध्यक्ष एलिसा डी एंडा मदराजो यांनी म्हटलं आहे. &nb...

June 3, 2025 2:59 PM June 3, 2025 2:59 PM

views 12

संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंडिया आघाडीच्या सोळा घटक पक्षांनी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती काँग्रेस खासदार दीपेंदर सिंह हुड्डा यानी बातमीदारांना दिली.    पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सर्व विरोधी पक्ष संरक्षण दल आणि सरकारच्या ...

May 7, 2025 4:01 PM May 7, 2025 4:01 PM

views 13

देशात आज ‘मॉक ड्रिल’ !

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखेरीज ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी आवश्यक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती...

May 6, 2025 8:03 PM May 6, 2025 8:03 PM

views 10

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जगाचा पाठिंबा

जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायाने केलेल्या निदर्शनांमधे तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सहभागी झाले. अतिरेकी दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचं आवाहन त्यांनी केलं. शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी प्रार्थनासभा आणि निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले होते. स्पेन, कॅनडा, स्वीडन या देशातही असे कार्यक्रम झाले.

May 5, 2025 7:36 PM May 5, 2025 7:36 PM

views 13

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळ दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीची बांधिलकी व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी समाजमाध्यमात सांगितलं आहे.  

May 5, 2025 7:49 PM May 5, 2025 7:49 PM

views 9

भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बागलिहार धरणातलं पाणी अडवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. २२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी  हल्ल्यात २६ नागरिक मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणी वाटपाचा  सिंधु करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. १९६० मधे हा करार करण्यात आला होता. बागलिहार धरणावरून भारत आणि पाकिस्तानमधे गेल...

May 3, 2025 12:38 PM May 3, 2025 12:38 PM

views 9

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताची पाकिस्तानकडून आयात बंद

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

May 1, 2025 7:59 PM May 1, 2025 7:59 PM

views 13

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.  अशा प्रकारची न्यायालयीन चौकशी सैन्यदलाचं धैर्य खच्ची करु शकेल असं कारण न्यायालयानं दिलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही याचिका करणं चुकीचं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

April 29, 2025 9:10 PM April 29, 2025 9:10 PM

views 13

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सेनाप्रमुख सीडीएस अनिल चौहन तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.