December 15, 2025 8:06 PM December 15, 2025 8:06 PM

views 12

Pahalgam Attack : NIA कडून आरोपपत्र दाखल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज जम्मू इथल्या एनआयए विशेष न्यायालयासमोर एकंदर सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दोन दहशतवादी संघटनांवरही एनआयएनं आरोप लावले आहेत. १५००पेक्षा जास्त पानांच्या या आरोपपत्रात पाकिस्तानी दहशतवादी साजिद जट्ट याच्यासह ऑपरेशन महादेवअंतर्गत सुरक्षादलांच्या कारवाईत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचाही आरोपपत्रात समावेश आहे.

July 18, 2025 2:16 PM July 18, 2025 2:16 PM

views 16

पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार टीआरएफ गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याचं भारताकडून स्वागत

पहलगाम  दहशतवादी हल्ल्याला जबाबदार  द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. टीआरएफ हा लष्कर ए तैयबाप्रणित गट आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्री  डॉ. एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय की य...

July 3, 2025 10:23 AM July 3, 2025 10:23 AM

views 13

पहलगाम हल्ल्यातील आरोपी संघटनांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातले आरोपी, त्यांची संघटना आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणारे या सगळ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जावी असं आवाहन क्वाड सदस्य देशांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी यासाठी सहकार्य करावं अशी विनंतीदेखील सदस्य देशांनी केली. क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेत बैठक झाल्यानंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं.   या निवेदनात पहलगाम घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. क्वाड देशांनी खुल्या आणि मुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राबद्दल...

July 2, 2025 1:52 PM July 2, 2025 1:52 PM

views 7

क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध

वॉशिंग्टन डीसी मधे झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यासोबतचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आणि संबंधित सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या अधिनियमानुसार सक्रियपणे सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. क्वाडनं आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह सुरू केलं असून त्याचा उद्देश आर्थिक सुर...

May 11, 2025 8:46 PM May 11, 2025 8:46 PM

views 13

विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.   काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन  खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे. या मुद्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजमाध्यमांवर केली...

May 6, 2025 2:47 PM May 6, 2025 2:47 PM

views 7

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल, असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले. दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.