July 20, 2024 8:01 PM July 20, 2024 8:01 PM
5
आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं निधन
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या ओडिशातल्या आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं आज मूत्रपिंडाच्या विकारानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पुजारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. कमला यांनी जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यात आणि स्वदेशी बीजाचं रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले.