May 27, 2025 1:33 PM May 27, 2025 1:33 PM

views 14

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. या वर्षी सरकारनं १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश आहे. पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी ७१ पद्म सन्मान प्रदान केले. आजच्या कार्यक्रमात ६८ मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येतील. 

April 29, 2025 9:33 AM April 29, 2025 9:33 AM

views 5

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि गझल गायक पंकज उधास यांना ‘पद्मभूषण सन्मान’ प्रदान करण्यात आला.   पंकज उधास यांच्या पत्नीने हा सन्मान स्विकारला. मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक,साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील तर चैत्राम पवार यांना पर्यावरण ,वनसंवर्धन, आणि सामाजिक क्षेत्रातील कामासाठी पद्मश्री सन्मान देण्यात आला.   अरुंधती भट्टाचार्य, पवनकुम...

September 10, 2024 10:27 AM September 10, 2024 10:27 AM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पद्म पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचं आवाहन

केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी व्यक्तींना नामांकीत करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नामांकन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. आतापर्यंत  पद्म पुरस्कारांसाठी अनेक व्यक्तींची नावं सुचवल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत तळागाळात काम करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. या व्यक्तींचं कार्य सर्वांना प्रेरणा देणारं असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सा...