December 5, 2024 8:09 PM December 5, 2024 8:09 PM

views 3

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्रा. सौमित्र दत्ता यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्राध्यापक सौमित्र दत्ता यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतातल्या सुशासनाबद्दल प्रशंसा केली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश जगातल्या प्रमुख आर्थिक शक्ती बनण्याकडे वेगानं वाटचाल करत असल्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला असल्याचंही सौमित्र दत्ता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. दत्ता यांनी प्रधानमंत्र्यांच्या प्रगती धोरणाचीही प्रशंसा केली.