December 25, 2024 12:48 PM December 25, 2024 12:48 PM

views 10

प्रशासन सुलभ करण्यासाठी सुमारे २००० कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते.