December 7, 2024 7:07 PM December 7, 2024 7:07 PM

views 14

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल-नवनीत कुमार सहगल

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल तसंच प्रसारभारतीला आपल्या प्रेक्षकांची व्याप्ती वाढवण्यास मदत  होईल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं दूरदर्शनच्या  कार्यालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ओटीटीद्वारे नवे कार्यक्रम प्रेक्षकाच्या भेटीला येतीलच तसंच जुन्या कार्यक्रमांचा आनंदही लुटता येईल, असं सहगल यांनी सांगितलं.

November 21, 2024 2:55 PM November 21, 2024 2:55 PM

views 15

प्रसार भारतीची WAVES ही नवी OTT सेवा सुरू

राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं ओटीटी व्यासपीठ वेव तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. जुन्या काळातला करमणूक ठेवा नव्या तंत्रज्ञानात लोकांसमोर आणण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. वेव या व्यासपीठाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हमलोग सारख्या मालिका पुन्हा पाहता येणार आहे. इतर ओटीटी व्यासपीठांपेक्षा वेव वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सैगल म्हणाले. वेव द्वारे १२ भाषांतले १० प्रकारचे कार्यक्रम प्...