December 21, 2024 3:21 PM December 21, 2024 3:21 PM

views 7

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत भारतीय अनुजा लघुपटाला स्थान

२०२५ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ या भारतीय लघुपटाने स्थान मिळवलं आहे. १८० लघुपटांमधून ‘अनुजा’ची निवड करण्यात आली आहे. सुचित्रा मटाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून गुनित मोंगा या कार्यकारी निर्मात्या आहेत. तर ऍडम ग्रेव्हस यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. या लघुपटात अभिनेते नागेश भोसले, सजदा पठाण, अनन्या शानबाग, गुलशन वालिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

December 18, 2024 4:56 PM December 18, 2024 4:56 PM

views 6

‘लापता लेडीज’ चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर

आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा चित्रपट ९७व्या अकादमी पुरस्कारासाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृत रीत्या पाठवण्यात आला होता. मात्र अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. हिंदी भाषेत चित्रीत केलेल्या ब्रिटीश-भारतीय 'संतोष' या चित्रपटानं १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पण, हा चित्रपट ब्रिटनकडून सादर होत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ ला होणार आहे.

September 23, 2024 8:04 PM September 23, 2024 8:04 PM

views 18

२०२५ मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व “लापता लेडीज” करणार

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मधे होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महासंघानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.