August 3, 2025 7:01 PM August 3, 2025 7:01 PM
6
राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ
राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे. अवयवदान दिनानिमित्त आजपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात अवयवदान पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्त जनजागृतीपर रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकरता अवयवदान विषयावर कार्यशाळा, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आशा सेविका यांच्यासाठीह...