September 26, 2024 11:34 AM
21
देशाच्या एकंदर आरोग्य खर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट
भारताच्या एकंदर आरोग्य खर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाली आहे. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, ते २०२१ मध्ये ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीचा राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतचा अहवाल काल प्रकाशित केला. त्यातून ही बाब समोर आली आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरू...