September 20, 2024 6:48 PM September 20, 2024 6:48 PM
11
तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवण्याचे आदेश
तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास करुन सरकार योग्य कारवाई करेल असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले. प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे.