May 12, 2025 1:27 PM May 12, 2025 1:27 PM

views 6

सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेहावर आज अंत्यसंस्कार

 जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात, सीमेवर तसंच देशातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत सर्वत्र शांतता होती, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून कुठेही हल्ले किंवा चिथावणीखोर हालचालींचं वृत्त नाही.   दरम्यान, गेल्या शनिवारी पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात, शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेह आज सकाळी दिल्लीत आणण्यात आला. बिहारमधल्या छपरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

May 12, 2025 9:47 AM May 12, 2025 9:47 AM

views 6

ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी काल दिली. लष्करी कार्यवाही महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कार्यवाही महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कार्यवाही महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले.   ठार झालेल्...

May 9, 2025 8:09 PM May 9, 2025 8:09 PM

views 11

ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायाचा पाठिंबा

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिका, यूके, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.   युरोपीय संघ आणि सर्व २७ सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं समर्थन करताना, संयम ठेवायची आणि चर्चेतून मार्ग काढायची सूचना केली आहे. रशियानंही संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.