June 21, 2025 12:58 PM June 21, 2025 12:58 PM

views 2

ऑपरेशन सिंधु : इराणमधून 290 भारतीयांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत दाखल

ऑपरेशन सिंधु अंतर्गत इराणमधून २९० भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत पोहोचलं. इस्राइल आणि ईराण यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधु सुरू करण्यात आलं आहे. इराणमधल्या भारतीय नागरिकांना, तेहरानमधल्या भारतीय दूतावासाशी आणि नवी दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या २४ तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.