October 12, 2024 8:55 PM October 12, 2024 8:55 PM

views 16

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर ९१ हजार आंतरवासिता संधी उपलब्ध

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत १९३ कंपन्यांनी ९१ हजार इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार २५ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.   कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, उर्जा, पर्यटन यासारख्या विविध २४ क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ या काळात २१ ते २४ वर्षे वयोगटातल्या सव्वा लाख जणांना आंतरवासिता संधी मिळवून द...

September 1, 2024 1:24 PM September 1, 2024 1:24 PM

views 5

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्य...