May 7, 2025 8:26 PM

views 31

केंद्रीय गृहमंत्र्यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. सीमावर्ती  भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना दिले. सीमेजवळच्या राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसंच मुख्य सचिव यांची बैठक घेऊन गृहमंत्र्यांनी  त्यांना मार्गदर्शन केलं.  

May 7, 2025 6:58 PM

views 23

‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक

भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे.   पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जगानं दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्याला भारतीय ...

May 7, 2025 1:54 PM

views 24

देशातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद

भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथली विमान वाहतूक येत्या १० तारखेपर्यंत रद्द केली आहे.   हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं विमान कंपन्यांनी सांगितलं. या काळातल्या वैध तिकिटांसाठी एक वेळच्या बदलासाठी शुल्क लावलं जाणार नाही किंवा संपूर्ण परतावा मिळू शकेल. प्रवाशांनी आधी आपल्या विमान प्रवासाब...