May 15, 2025 7:54 PM May 15, 2025 7:54 PM
4
ऑपरेशन सिंदूरची जगभरात प्रशंसा
ऑपरेशन सिंदूरची जगभरातून प्रशंसा होत आहे. दीर्घ काळापासून अशी मोहीम राबवण्याची आवश्यकता होती असं ब्रिटीश लेखक आणि राजकारण विश्लेषक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान अपयशी, आणि दहशतवादी कारवायांचं माहेरघर असल्याचं मत त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना व्यक्त केलं. पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करताना पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी दहशतवाद्यांना केवळ हल्लेखोर असं संबोधलं याबद्दल त्यांनी टीका केली.