May 30, 2025 7:34 PM

views 38

सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल बीड शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन

भारतीय सैनिकांनी सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल  शौर्याला सलाम करण्यासाठी  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड शहरात आज  भारत झिंदाबाद तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली.  या रॅलीत महीला, रिपाइं पदाधिकारी  आणि  कार्यकर्ते हजारोच्या संखेने सामील झाले होते. 

May 29, 2025 8:12 PM

views 37

सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका

ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे  वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.   संजयकुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने इंडोनेशियातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या नेतृत्वाशी संवाद साधला आणि दहशतवाद विरोधातील भारताच्या शून्य सहनशक्ती धोरणाबाबात चर्चा केली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पनामात भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या बैठकीत दहशतवाद विरोधात भारत कठोर धोरणांचा अवलंब करत असल्याचं  अधोरेखीत केलं. ...

May 25, 2025 8:02 PM

views 40

‘ऑपरेशन सिंदूर’ हे निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  या कारवाईने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं  मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं. आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यानं केलेल्या पराक्रमानं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ झाली. या कारवाईतली अचूकता अद्भुत असल्याचं ते म्हण...

May 24, 2025 7:04 PM

views 27

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळं रवाना

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. याअंतर्गत  भाजपाचे खासदार बैजयंत पांडा, काँग्रेस खासदार शशी थरुर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आणखी तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं आज पहाटे परदेशी रवाना झाली.   द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वातल्या प्रतिनिधीमंडळानं आज रशियात मॉस्को इथल्या भारतीय दूतावासात संयुक्त पत्रकार परिषदेत दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहिष्णता ध...

May 23, 2025 1:39 PM

views 17

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत,७ बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं  येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.    भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रशिया आणि भारत हे परस्परांचे धोरणात्मक भागीदार देश  असून राजनैतिक मुद्दे  आणि व्यापाराबाबत कायम एकत्रितपणे काम करतात ,असं प्रतिपादन  द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी रशियाची राजधानी मॉस्को इथं आज माध्यमांशी बोलताना केलं. कनिमोळी करुणानिधी यांच...

May 22, 2025 8:56 PM

views 18

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी सुरु

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं  येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.    खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. पहलगाम इथल्या  दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांप्रती जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांनी सहवेदना व्यक्ती  केली. कोणत्याही प्रक...

May 21, 2025 3:52 PM

views 24

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळं रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणांतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल. रवाना होण्यापूर्वी संजय झा यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.    शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होणार आहे. हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती...

May 20, 2025 12:59 PM

views 32

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री संसद सदस्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात माहिती देणार

भारतातर्फे सर्वपक्षीय संसद सदस्यांची शिष्टमंडळं विविध देशांना भेट देऊन देशाची बाजू मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संसदेत संसद सदस्यांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार आहेत. असे सात शिष्टमंडळं विविध देशात जाणार आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळाचे सदस्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती देणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ही शिष्टमंडळं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनाही भेटणार आहेत.

May 19, 2025 1:45 PM

views 26

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.   राजस्थानच्या जोधपूर इथं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी एक देश, एक धडकन अशा घोषणा दिल्या.   भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी हिमाचल प्रदेशातल्या पांगी परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.

May 19, 2025 10:27 AM

views 20

ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं

तीनही सैन्यदलांच्या योग्य समन्वयातून, धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं.   सध्याच्या बहुस्तरीय युद्धपद्धतीच्या काळात भारताच्या लष्करानं आपली एकतेची ताकद आणि धोरणात्मक दृष्टीकोन यांच्या बळावर नियंत्रण रेषेसह पाकिस्तानच्या अंतर्गत भागातल...