October 21, 2025 9:38 AM

views 49

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली – प्रधानमंत्री

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे. ही केवळ एक युद्धनौका नाही, तर २१ शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्ध...

August 9, 2025 3:11 PM

views 8

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याचं हवाई दलप्रमुखांचं निवेदन

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात दिली. यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच, तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही कारवाई जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं.   शाहबाज जेकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्ह...

July 25, 2025 9:08 PM

views 13

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे स्मरण करण्यासाठी शौर्य भारत कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्लीतल्या  हवाई दलाच्या  स्टेशनवरून हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी आज शौर्य भारत कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.  "ऑपरेशन सिंदूर" चं स्मरण आणि आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्याचा सन्मान करणं, हा या कार रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली हवाईदल स्टेशन अंबाला मार्गे हवाईदल स्टेशन आदमपूर इथं जाणार आहे आणि रविवारी या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये भारतीय तटरक्षक दल, डीआरडीओ आणि एनसीसी या तिन्ही दलांमधले एकूण ११२ सैनिक सहभागी झाले आहेत. ही रॅली महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेट देऊन...

June 1, 2025 6:14 PM

views 89

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निबंध स्पर्धांच आयोजन

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जी.ओ.व्ही. इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.    याअंतर्गत ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या विषयावरच्या निबंध स्पर्धंच आयोजन केलं आहे. या स्पर्धेतल्या  पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, तसंच त्यांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्य...

May 30, 2025 7:58 PM

views 31

नागरिकांचं संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार आता संपूर्ण जग मान्य करत आहे- संरक्षणमंत्री

दहशतवादापासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार आता संपूर्ण जग मान्य करत आहे, असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केलं. ते आज गोव्यात आयएनएस विक्रांतवर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्ताननं स्वतःच्या हातांनी त्यांच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादाची समूळ नष्ट करायला हवीत, तसंच हाफिज सईद आणि मसूद अझहर सारख्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

May 26, 2025 1:34 PM

views 20

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका, इथिओप...

May 25, 2025 8:12 PM

views 16

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने आज कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका...

May 21, 2025 10:09 AM

views 22

भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्कासाठी स्थापन केलेल्या सातपैकी पहिले सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज चार देशांना रवाना होत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएई, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओनला रवाना होईल. गुरुवारी खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला रवाना होईल तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आ...

May 18, 2025 8:39 PM

views 20

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं जाहीर

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचा गट सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल.   भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा गट यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि ...

May 14, 2025 3:32 PM

views 25

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संरक्षणदल  प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंग, आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. दहशतवादाचा मुकाबला करताना सेनादलांनी दाखवलेल्या समर्पण आणि शौर्याचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.