April 1, 2025 2:46 PM April 1, 2025 2:46 PM

views 26

‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारताने म्यानमारला पाठवली मदत

म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपासाठी मदत म्हणून भारताने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १६ टन अत्यावश्यक मदत सामुग्री, तांदूळ आणि खाद्यपदार्थ घेऊन वायुसेनेच एक विमान मंडालेकडे निघालं आहे. नौसेनेचे जहाज आय एन एस घडियाल देखील ४४२ मेट्रिक टन मदतसामुग्री घेऊन विशाखापट्टणम इथून निघालं आहे. मंडाले इथं भारतीय लष्कराचं वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत झालं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. म्यान्मांमधल्या भारतीय दूतावासाने तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतका...