January 17, 2025 1:38 PM January 17, 2025 1:38 PM

views 17

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला खेळाडू अग्रमानांकीत पी. व्ही. सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिने जपानच्या मनामी सुईझू हिचा २१-१५, २१-१३, असा पराभव केला.   उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस् टुनजुंग हिच्याशी होणार आहे. याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेदेखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

October 17, 2024 12:42 PM October 17, 2024 12:42 PM

views 7

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची चीनच्या हान यू हिच्याशी लढत

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या पी व्ही सिंधूची गाठ आज उप-उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान यू हिच्याशी पडणार आहे. स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याने सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती. आज दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.