September 26, 2024 6:48 PM September 26, 2024 6:48 PM
32
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज किदाम्बी श्रीकांतचा सामना आयुष शेट्टीशी होणार
मकाऊ इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज दुपारी भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच आयुष शेट्टीशी होणार आहे. तर महिला एकेरीत आज भारताच्या तस्निम मीरचा सामना जपानच्या तोमोका मियाकाझीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीचा सामना तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांच्याशी होईल.