October 5, 2025 7:43 PM October 5, 2025 7:43 PM

views 34

तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा OPEC+चा निर्णय

पेट्रोलच्या उत्पादनात वाढ झाल्यानं ओपेक प्लस या पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांच्या गटानं नोव्हेंबर महिन्यापासून तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  या गटाचा भाग असलेल्या रशिया आणि इतर लहान उत्पादकांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ओपेकनं आपल्या तेलाच्या उत्पादनाच्या प्रमाणात या वर्षीपासून वाढ केली असून  ते प्रतिदिन २६ लाख बॅरल्स इतकं केलं आहे. हे प्रमाण जागतिक मागणीच्या अडीच टक्के इतकं आहे.

March 4, 2025 8:08 PM March 4, 2025 8:08 PM

views 16

ओपेकच्या नियोजित उत्पादन वाढीच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण

पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना-ओपेक च्या नियोजित उत्पादन वाढीच्या वृत्तानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलर ५७ सेंट प्रति बॅरल झाला आहे तर अमेरिकन क्रूडचा भाव ६७ डॉलर ५१ सेंट डॉलर प्रति बॅरल झाला आहे. ओपेक आणि रशियासारख्या तेल उत्पादक देशांनी एप्रिलमध्ये दररोज १ लाख ३८ हजार बॅरल इतकी तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

January 16, 2025 2:50 PM January 16, 2025 2:50 PM

views 15

ओपेक ने २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाच्या मागणी वाढीचा अंदाज वर्तवला आहे

वर्ष २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची मागणी १४ लाख ३० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढून १ हजार ६६ लाख बॅरल प्रति दिवस इतकी होईल, असा अंदाज पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’ने वर्तवला आहे. या वर्षी ही मागणी १४ लाख ५० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढण्याचा ‘ओपेक’चा अंदाज आहे. जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या वृद्धीच्या आधारे जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी ३ पूर्णांक १ दशांश टक्क्याने, तर पुढच्या वर्षी ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांनी वाढेल, असा अंदाजही ‘ओपेक’च्या एका अहवालात वर्तवण्यात आ...