November 15, 2024 1:39 PM November 15, 2024 1:39 PM

views 3

वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन

दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४२० इतक्या अतिगंभीर स्थितीत होता. पुढचे दोन दिवस त्यात धुक्याची भर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढचे आदेश येईपर्यंत ऑनलाईन तत्वावर चालवल्या जातील असे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिले आहेत. हवेचं दर्जामापन करणाऱ्या समितीने दिलेल्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आल...