August 23, 2025 10:07 AM

views 53

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंजुरी दिली. हे विधेयक परवा लोकसभेत, तर काल राज्यसभेत मंजूर झालं होतं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल.   तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा, जाहिरातींच्या रूपानं पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेय...