June 3, 2025 3:23 PM June 3, 2025 3:23 PM

views 11

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी मुदतवाढ

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ नोंदणीसाठी ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली. ही मुदत ३ जूनला संपणार होती. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि  कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला. या निर्णयामुळे होण्याऱ्या बदलानुसार विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, २ जूनपर्यंत १० लाखांहून...

February 28, 2025 7:35 PM February 28, 2025 7:35 PM

views 15

अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता ११ वी प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज प्रसिद्ध झाला.आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले ११ वी प्रवेश ऑनलाइन होत होते. इयत्ता ११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार असले तरी पहिल्या ४ फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होतील.