September 14, 2024 9:22 AM September 14, 2024 9:22 AM
11
बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीवरील किमान दर केंद्राकडून रद्द
केंद्र सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लागणरं, नोंदणी-सह-वाटप प्रमाणपत्र जारी करण्यासाठीची 950 डॉलर्स प्रति टन ही किमान निर्यात किंमत रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाची समाज मध्यमांवरील संदेशातून प्रशंसा केली आहे. या निर्णयामुळे चांगल्या प्रतीच्या तांदळाच्या निर्यातीला चालना मिळून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असं गोयल यांनी या संदेशांत म्हंटलं आहे.