April 13, 2025 8:06 PM April 13, 2025 8:06 PM
13
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण
नाशिक जिल्ह्यात लासलगावसह सर्व बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरचं २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही भाव चांगला मिळत नसल्यानं केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये काल उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १३०१ रुपये तर सरासरी ११२५ रुपये क्विंटल भाव मिळाला तर लाल कांद्याला कमीत कमी ...