August 18, 2025 2:33 PM August 18, 2025 2:33 PM

views 2

भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेश सरकारची परवानगी

बांग्लादेशामध्ये कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं परवानगी दिली आहे. भारतातून पाठवण्यात आलेली १५० टन कांद्याची पहिली खेप काल दुपारी बांगलादेशात पोहोचली. २९ टन भारतीय कांद्याची शेवटची खेप २ मार्च रोजी बांग्लादेशात पाठवण्यात आली होती. स्थानिक कांद्याच्या किमतीत घसरण तसंच भारतीय कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे आयात थांबवण्यात आली.

March 22, 2025 8:45 PM March 22, 2025 8:45 PM

views 9

कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर २०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातून १७ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांदा निर्यात झाला आहे. चालू आर्थिक वर्षात १८ मार्चपर्यंत साडे ११ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर कमी झ...

September 22, 2024 3:41 PM September 22, 2024 3:41 PM

views 9

नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा सुरु होणार

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखाडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं. नाशिक रोड आणि लासलगाव रेल्वेस्थानकातून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून ही निर्यात सुरू होईल. कांदा व्यापारी संघटनेबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.

August 8, 2024 3:11 PM August 8, 2024 3:11 PM

views 10

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल.   बांगलादेशातली कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो. महाराष्ट्रातल्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून सर्वाधिक कांदा निर्यात होतो. सध्या राजकीय अस्थिरतेमुळे ७० ट्रक सीमेवर अडकले होते. त्यातल्या काहींना परवानगी मिळाल्यानं ते बांगलादेशात पोहोचले आहेत. मात्र, परिस्थिती आटोक्यात आली नाह...