March 11, 2025 8:57 PM March 11, 2025 8:57 PM

views 15

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथे आज शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. गुरुकृपा आडत संघटनेच्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीचे तीन कोटी रुपये थकवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चार महिने होऊनही थकबाकी मिळालेली नाही, शेतमालाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आंदोलन सुरू असलं तरी बाजार समितीने केलेल्या मध्यस्थीमुळे लिलाव पूर्ववत सुरू झाले. 

September 23, 2024 2:49 PM September 23, 2024 2:49 PM

views 10

घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न

कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३५ रुपये दरानं कांदाविक्री करत आहे. या आठवड्यापासून देशातल्या प्रमुख शहरांमधे अनुदानित दराने कांदाविक्री सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.   

September 18, 2024 5:48 PM September 18, 2024 5:48 PM

views 10

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु

  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु झाले. आज १५२ गाड्यांची आवक झाली असून दिवसभरात कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत भाव मिळाला. गेले काही दिवस कांद्याचा पुरवठा कमी झाल्यानं किरकोळ विक्रीचे दर ६० ते ७० रुपये किलो पर्यंत पोहोचले होते.

September 5, 2024 8:15 PM September 5, 2024 8:15 PM

views 7

३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरू

केंद्र सरकारनं ३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री आजपासून सुरु केली. दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुृंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रावर ही विक्री केली जाते.

July 6, 2024 10:26 AM July 6, 2024 10:26 AM

views 13

रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात कांद्याचं उत्पादन कमी असूनही देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या रबी हंगामात अंदाजे 191 लाख टन कांद्याचं उत्पादन देशांतर्गत वापरासाठी पुरेसं आहे असं मंत्रालयानं सांगितलं.

June 13, 2024 7:32 PM June 13, 2024 7:32 PM

आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.  नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे आवक घटली असून त्याचा परिणाम किमतीवर झाल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं.