August 3, 2025 10:03 AM August 3, 2025 10:03 AM
8
खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार,’एक तालुका, एक बाजार समिती’चं नियोजन
राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरु असून, केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. आगामी काळात 'एक तालुका एक बाजार समिती’ हे धोरण राहणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.