April 22, 2025 1:28 PM April 22, 2025 1:28 PM
18
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आता सुरु आहे. एकोणचाळीस सदस्याच्या या बैठकीत लोकसभेतले सत्तावीस तर राज्यसभेतले बारा खासदार सहभागी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या निवडणूकांमुळे व्यवस्थेवर सतत तयारीचा ताण येतो. तसंच विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यायाने शिक्षणपद्धतीवरसुद्धा ताण येतो. यामुळे एक देश एक निवडणूक ही संकल्पना राष्ट्रहिताची असल्याचं संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. बैठकीच्या पहिल...